Weight Loss Expert Dr Sonal's DietPlan | साधारण कडून असाधारण कडे जातानाचा प्रवास अतिशय खडतर असत

नमस्कार 20 फेब्रुवारी 2022 बारा वाजून बावीस मिनिटं साधारण कडून असाधारण कडे जातानाचा प्रवास अतिशय खडतर असतो. बरेचदा छोट्या छोट्या यशाला आपण डोक्यात घालून घेतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण असाधारण व्यक्तीमत्व आहोत. थोडस परीक्षण करणं अतिशय आवश्यक आहे. कारण जेव्हा अपार यश मिळत असतं तर त्या प्रत्येक यशामागे खडतर प्रवास असतो. खरंच तितका खडतर प्रवास किंवा तितके उतार-चढाव आपल्या आयुष्यात आले आहेत की नाही याची पडताळणी करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्यात उत्तम असेल तर जग शिकावं किंवा पुस्तक वाचावं असं मला वाटतं. प्रत्येकाची साधारण होण्याची जी व्याख्या असते, ती वेगवेगळी असते कुणाला वाटतं खूप पैसा मिळेल तेव्हा आपण साधारण होऊन किंवा खूप प्रसिद्धी कदाचित आपल्याला दुसऱ्या पेक्षा वेगळे बनवेल . पण भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या लोकांना यश काय असतं किंवा साधारण काय असतं हे बहुधा कळतच नसतं. यश अपयशाच्या गोष्टी बाजूला ठेवून साधी सरळ वजन कमी करण्याची समजा गोष्ट असेल तर त्या बाबतीतही ही बाब लागू पडते. शरीरात जेव्हा बदल होतात तेव्हा दोन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे शरीराला कुठल्यातरी आजाराला समोर जावं लागतं तेव्हा शरीर स्वतःचा आकारमान बदलत . मेहनत करून शरीर वाढवणे किंवा शरीर कमी करणे ही प्रक्रिया होते. नुसताच विचार करून असे होत नाही. आज अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे. वजन कमी करावे आणि सुडौल बांधा असावा .असं प्रत्येकाला वाटत असतं विशेषतः हे प्रत्येक स्त्रीला ते वाटत असतं. पण दुसऱ्या पेक्षा किती व्यवस्थित आहो किंवा आपण दुसऱ्या पेक्षा का करू शकत नाही याची भरपूर कारणे त्यांच्याजवळ असतात आणि या कारणांच्या मागे स्वतःला त्या लपवत असतात. भौतिक जगात तुम्ही समजा ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पण कुठलीही गोष्ट सहजासहजी तुम्हाला मिळेल असे होत नाही त्यासाठी जितके परिश्रम तुम्हाला घ्यायचे असतात तितके घ्यावेच लागतात. फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही सोशल मीडियावर मी भरपूर कार्यरत असते तिथून बरेच लोक मला बघत असतात आणि बघणार यांमधून खूप जणांची इच्छा असते की पुढे होऊन आपण वजन कमी करावे. तसे कॉल देखील मला येतात. मीदेखील माझं काम आहे त्या पद्धतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. काही होत नाही वर्षभर ही व्यक्ती मला लाईक कमेंट करत असते पण स्वतःहून करणं कदाचित त्यांना जड जात असतं. एक वर्षाच्या पूर्ण कालावधीनंतर मला या महिलेने कॉल केला आणि वजन कमी करण्याची त्यांची इच्छा बोलून दाखवली मी मान्य केली. माझं आवडतं काम आहे. सुरुवातीला काही दिवस गोष्टी बदलताना त्यांना थोडासा त्रास सहन करावा लागला कारण बाकीच्या गोष्टी त्यांच्या दैनंदिनी मांडणं ही ही एक तारेवरची कसरतच होती. दोन आठवडे झाल्यानंतर आणि वजनाचा काटा आपल्याला हव्या त्या बाजूने गेल्यावर होणारा आनंद शब्दात वर्णन करणे कठीण आहे. खरा आमचा प्रवास सुरु झाला. एक महिना दोन महिने तीन महिने ........सहा महिने..... खडतर प्रवास आणि त्यानंतर 30 किलो वजन कमी झाले. आकडा बोलताना भयंकर सोपी वाटतो आहे पण हेच तीस किलो आणि सहा महिने आमच्या दोघींसाठी हि कठीण होते. मला दिव्यात तेल घालून दिवा तेवत ठेवायचा होता म्हणजेच त्यांना सतत प्रोत्साहित करून त्यांच्याकडून ते वजन कमी करून घ्यावयाचे होते. त्यांनी देखील तितकीच साथ मला दिली आणि त्यामुळे कठीण वाटणारा पल्ला होता पार झाला. अशा कितीतरी सक्सेस स्टोरी ज्यांना मी happy स्टोरी म्हणते. माझ्या कारकिर्दीच्या कागदावर मी लिहू शकते....... बर वजन कमी करायला येणारा प्रत्येक माणूस फक्त वजनच कमी करत नाही तर सोबत आत्मविश्वास मिळतो आरोग्य मिळवतो दुखणारे गुडघे पुन्हा त्यांना चालायला शिकवतात डोकंवू पाहणारा मधुमेह पुन्हा वापस जातो बीपीची गोळी कमी होते आणि चेहर्‍यावर हसू येतं. आमच्याकडे एक मशीन आहे ती तर वजना सोबत वयही कमी दाखवते. बोलायला जरी सोपी असलं, तरी प्रत्येक वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला त्यामागचा खडतर प्रवास त्यामागची महिन्यात ही तितकीच मोठी असते म्हणून त्या मेहनतीला माझा सलाम डॉक्टर सोनल कोलते होमिओपॅथिक तज्ञ /आहार तज्ञ

Comments